Ad will apear here
Next
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार
अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन


रत्नागिरी : 
‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान, स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

२०१२मधील एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली.

‘कोकण ही बुद्धिवंतांची भूमी आहे. या भूमीने अनेक भारतरत्ने दिली. अशा या भूमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो,’ असे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात ‘उच्च शिक्षणातील संधी’ या विषयावर अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे. सायंकालीन सत्रात प्राध्यापक रेखा सिंघल यांचे ‘काजू, आंबा, फणस यांची उपयोगिता’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर मधt मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे

१९ जानेवारी रोजी ‘उद्योगधंदे व भविष्यातील संधी’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZOKCI
Similar Posts
मालगुंड येथे १८, १९ जानेवारीला चौपन्नावे मराठी विज्ञान अधिवेशन रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेचा रत्नागिरी विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने चौपन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन १८ आणि १९ जानेवारी २०२० रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात होणार आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होईल
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे रत्नागिरी : ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ
एड्सविषयीच्या जनजागृतीत नर्सेसचे योगदान महत्त्वाचे रत्नागिरी : ‘एड्सबद्दलच्या जनजागृतीत आणि रुग्णांच्या समुपदेशनात नर्सेसचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या खूप मोठ्या समन्वयक आहेत. त्यामुळे जनजागृतीची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांवर आहे. एड्सग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याचीही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language